जीव पिसाटला गाणं लीरिक्स | jeev pisatala song lyrics

या लेखात जीव पिसाटला गाणं लीरिक्स देण्यात आले आहे. jeev pisatala song lyrics आपण  येथे मिळवणार आहात. 


Jeev Pisatala Song Lyrics


 वेड लावे जीवाला बघुनी तुला

पास असुनी तुझी आस लागे मला


एक क्षणही नकोसा दुरावा तुझा

श्वास माझा म्हणू की पुरावा तुझा

काय होणार माझे कळे ना मला

प्रेम छळते किती हे मला तुला

जीव पिसाटला पिसाटला रामा


बोलणे हे तुझे की फुलांचा सडा

हासता किणकिणे चांदण्यांचा चुडा

एवढासाच शृंगार पुरतो तुला

दृष्ट लागो न माझीच माझ्या फुला

जीव पिसाटला पिसाटला रामा


तूच तू सोबती तूच दाही दिशा

ध्यास हि तूच नि तूच माझी नशा

सावली तू कधी तू उन्हाच्या झळा

सांग डोळ्यात लपवू कसा मी तुला

रंग झालो तुझा रंगता रंगता

आग पाणी जणू एक झाले आता

जीव पिसाटला पिसाटला रामा


Post a Comment

Previous Post Next Post