मित्रहो येथे आम्ही आपल्यासाठी मराठी बालगीत घड्याळात वाजला एक घेऊन आलेलो आहोत. ghadyalat vajle ek मराठी कविता लहान मुलांच्या आवडीची कविता आहे. येथे आपल्याला घड्याळात वाजला एक गाणे सोबत ghadyalat vajle ek marathi kavita lyrics देखील मिळणार आहे.
आपण ही कविता इतरांसोबतही शेअर करावी अशी अपेक्षा आहे. तर चला सर्वात आधी आपण ghadyalat vajle ek marathi kavita lyrics पाहूया..
घड्याळात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले दोन
आजीचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले तीन
हरवली माझी पिन न
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले चार
आईने दिला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले पाच
ताईने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले सात
आईने केला भात
भात जेवण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले आठ
दादा ने फोडला माठ
खापर उचलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले नऊ
पळाली आमची माऊ
माऊ ला शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले दहा
बाबा आले पहा
बाबांशी बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले अकरा
मी मारल्या चकरा
चकरा मारण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजले बारा
आईचा चढला पारा
गपचुप मी झोपून गेले
मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजला एक विडियो :
Post a Comment