Pavsachya Dhara Yeti Zara Zara Marathi Kavita : मित्रांनो आपण आपल्या शालेय जीवनात इयत्ता 4थी - 5 वी च्या अभ्यासक्रमात शांता शेळके यांची प्रसिद्ध कविता पावसाच्या धारा नक्कीच अभ्यासली असेल. पावसाच्या धारा येती झरझरा कविता कवीयंत्री शांता शेळके यांच्या प्रसिद्ध काव्य कवितांपैकी एक आहे.
जर आपण इंटरनेट वर शांता शेळके यांची Pavsachya Dhara Yeti Zara Zara ही कविता शोधीत असाल तर आजचा लेख आपणासाठी उपयोगी आहे. तर चला पावसाच्या धारा कविता सुरू करूया.
पावसाच्या धारा येती झरझरा कविता
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
डोईवरी मारा झाडांचिया तळी
गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
पावसात न्हाली, धरणी हासली,
देवजीच्या करणीने, मनी संतोषली !
- शांता शेळके
तर मित्रहो ही होती पावसाच्या धारा येती झरझरा (Pavsachya Dhara Marathi Kavita मराठी कविता आशा आहे. आशा करतो की शांता शेळके यांची Pavsachya Dhara Yeti Zara Zara कविता आपणास आवडली असेल व या कवितेला वाचून आपल्या बालपणीच्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या असतील. हे लेख इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद...
अधिक वाचा :
Post a Comment